कौशिकी हॉल पेण येथे पार पडलेल्या कै. पांडुरंग विठ्ठल घांग्रेकर स्मृती चषक राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेत मोठ्या गटात निकिता घाग आणि छोट्या गटात दुर्वा सुशांत झावरे ठरल्या विजेत्या

Raigad

पेण ः प्रतिनिधी
दत्त अवधुत एंटरटेनमेंट, स्वररंग पेण आणि दर्पण व्हिजन एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने कै. पांडुरंग घांग्रेकर स्मृती चषक राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेचे शानदार आयोजन कौशिकी हॉल, दत्त नगर गेट नंबर 2, पेण बोरगाव रोड येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक – निकिता घाग, दुसरा क्रमांक – मनाली करुणा संजय इंगळे, तृतीय क्रमांक – चेतन पाटील, उत्तेजनार्थ – केतन सुभाष गवळी तसेच छोटा गट प्रथम क्रमांक – दुर्वा सुशांत झावरे, दुसरा क्रमांक – तपस्या भानुदास पाटील, तृतीय – आराध्य समीर पाटील, उत्तेजनार्थ – स्मंद मंदार कोठेकर यांनी बक्षिसे पटकाविली तसेच परीक्षक पसंतीमध्ये विशेष बक्षीस मोठा गटात प्रकाश पाटील व श्रुती नाईक व छोटा गट विशेष बक्षीस अर्णव शिंदे व विहान नाईक यांनी बक्षिसे पटकाविले. या एकपात्री स्पर्धेचे परिक्षण विनोदी अभिनेते जयवंत भालेकर, दिग्दर्शक व अभिनेता देवेंद्र सरदार, लेखिका दर्शन कुकर्णी यांनी केले. तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैभवी म्हात्रे व हरेश पाटील यांनी केले. तर स्पर्धेचे उदघाटन रंगकर्मी राजन पांचाळ, सुनील पाटील गर्जा रायगडचे निर्माता संतोष पाटील व परीक्षकाच्या हस्ते करण्यात आले. तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक दत्त अवधुत एंटरटेनमेंटचे निर्माता कौस्तुभ छाया विलास भिडे, शाल्मली भिडे, विलास भिडे, छाया भिडे, हर्षदा भिडे, स्वररंगचे उपाध्यक्ष आणि साज मराठीचे निर्माता सुनिल पाटील, दिव्या घाडगे, कार्याध्यक्ष स्वप्नील साने, अजित साळवी, किरण देव, सुहास तेरवाडकर, सानिया पाटील, स्वरा पाटील, आदिती पाटील, पूजा सिंगासने, सायली पोतदार, उपासना जुईकर, अथर्व फाटक, विजय फाटक, आकाश मोकल, निलेश पाटील, अश्विन पाटील, अभिषेक देव, रोहित महाले, सलमान शेख, धनंजय शर्मा, निरंजन रोडेकर, प्रसाद म्हात्रे, आदींनी विशेष मेहनत घेतली. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी धुळे, पेण, रोहा, अलिबाग डोंबिवली, पुणे, मुंबई अश्या ठिकाणाहून स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणून दत्त अवधुत एंटरप्रायझेस व सह प्रायोजक म्हणून आर्य क्लासेस अपूर्वा नीरज साठे यांची मोलाची मदत लाभली. तसेच सदर कार्यक्रम हा दत्त अवधुत एंटरप्रायझेस या युटयुब चॅनेलवर लाइव्ह दाखविण्यात आला. यावेळी मनोगतात एकपात्री अभिनय स्पर्धा म्हणजे एकाच कलाकाराला एका विशिष्ट भूमिकेमध्ये स्वतःचे अभिनय कौशल्य सादर करण्याची संधी मिळते. यात एकच कलाकार विविध पात्रांच्या भावना, विचार आणि कृती प्रभावीपणे सादर करतो. असे कलाकार जास्तीत जास्त आपल्या रायगड जिल्हात व परिसरात तयार व्हावेत असे मत यावेळी परीक्षक देवेंद्र सरदार यांनी मांडले. दत्त अवधुत एंटरटेनमेंट हया प्रोडक्शन हाउस मार्फत डीएई हे ओटीटी ऍप लवकरच उपलब्ध होणार आहे तरी दत्त अवधुत एंटरटेनमेंट नेहमीच कलाकारांच्या कलागुणांना वाव, व्यासपीठ तसेच दर्जेदार एकपात्री एकांकिका सादर करणार्‍या कलाकारांचा मागे खंबीरपणे अनेक वर्षे उभे राहून हे काम करत आहे. नवीन कलाकार घडावेत नवीन कलाकृती घडाव्यात या करिता लागेल ती मदत संस्थेतर्फे देण्याचा मानस दत्त अवधुत एंटरटेनमेंट निर्माता कौस्तुभ विलास भिडे यांनी आपल्या मनोगतात बोलून दाखविला.