पेण येथील खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरण विधानसभेत 16 तारखेला होणार ठिय्या आंदोलन

Uncategorized

मुख्याध्यापक, अधिक्षीका निलंबित; मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती परंतू आरोग्य अधिकाऱ्यांचे काय ?

पेण : प्रतिनिधी

तालूक्यातील वरवणे येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी मुख्याध्यापक आणि वस्तीगृह अधिक्षीकेला निलंबित करण्यात आले असून त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली. मात्र दोषी असणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांचे काय? विधानसभा सदस्य राजकुमार बडोले, धर्मरावबाबा आत्राम, नाना पटोले यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आबिटकर बोलले की, राज्यात ‘कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम)’ हे अभियान राबविण्यात येत असून त्या अंतर्गत नियमित आरोग्य तपासणी व सर्वे वरवणे आश्रमशाळेत झाला. दरम्यान वरवणे येथील आश्रगशाळेतील खुशबू ठाकरे या विद्यार्थिनीच्या डाव्या डोळ्याखाली चट्टा आढळून आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्लल्‌यानुसार तिच्यावर कुष्ठरोग विरोधी बहुविध औषधोपचार सुरू करण्यात आले होते. दुर्दैवाने, उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी सुरू असून शवविच्छेदन अहवालानुसार टिशू अॅस्ट्रोपॅथोलॉजिकल तपासणी व रक्तनमुने केमिकल विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.

दरम्यान, आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांच्या स्तरावर देखील या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून संबंधित मुख्याध्यापक आणि महिला अधीक्षिका यांना अप्पर आयुक्त, आदिवासी विकास विभाग यांनी निलंबित केले असून त्यांच्यावर विभागीय चौकशी सुरू आहे. मात्र यातील खरे दोषी आरोग्य अधिकारी असून त्यांच्यावर कोणतीच कारावाई झाली नाही. म्हणून खुशबूचे कुटुंबिय व सामाजिक संस्था 16 जुलै रोजी पेण तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहेत तरी शासन कोणती भूमिका घेते याकडे आदिवासी बांधवांचे लक्ष लागून राहिले आहे.