पेण :- प्रतिनिधी
जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या फेज थ्री ची जनसुनावणी २२ ऑगस्ट रोजी पार पडली. यावेळी अनेकांनी जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या प्रदुषणावावत आपापल्या हरकती घेतल्या काहींनी. तर लांबलचक भाषण ठोकली. अधिकारी वर्गाला दिलेल्या हरकतींचा निर्णय ही आलेला नाही तेव्हाच काहीजण स्वतःच्या हितासाठी जनमोर्चाचे आयोजन करत आहेत. १३ ऑक्टोंबरला होणारा जनमोर्चा हा फक्त आणि फक्त स्वतःची पोळी भाजण्यासाठी आहे. यापलिकडे काही नाही. आम्ही कामगार जेएसडब्ल्यू स्टील कंपनीमध्ये काम करत असताना या कंपनीच्या जीवावरच आम्ही आमच्या संसाराचा गाडा हाकत आहोत. त्यामुळे किती प्रदुषण होते आणि किती प्रदुषण होत नाही यावावत आमच्यापेक्षा कुणलाचा माहिती नाही. परंतू काही जण फक्त आणि फक्त स्वतःची किंमत वाढवण्यासाठी हा जनमोर्चाचा खटाटोप करीत आहेत. जनमोर्चा काढून फक्त स्वहित जोपासन्याचा हा डाव आहे. यापलिकडे काहीच नाही. जे आयोजकामध्ये नाव आहेत. त्यांनी जनसुनावणीच्या वेळेला आपले मुद्दे मांडले असतील त्याच्या उत्तराची वाट का पाहत नाहीत? याचाच अर्थ स्वतःनी मांडलेले मुद्दे हे चुकीचे होते असे नाही ना? एकंदरीत स्वतः वर स्वतःचा विश्वास नसल्याने हे वेडेवाकडे चाळे सुरु केले आहेत. आजच्या घडीला ऑक्टोंबर हीट सुरु आहे जे आयोजक आहेत त्यांनी स्वतःच्या घरातीलच माणसं आणावी चुकीचे पत्रक वाटून ही मंडळी दिशाभूल करीत आहेत. त्यांचा आम्ही कामगार निषेध करीत आहोत.
एकंदरीत काय तर जनमोर्चा स्वतःची पोळी भाजण्यासाठी काढलेला आहे त्यामुळे या जनमोर्चामध्ये कितीजण सामील होतील हे येत्या सोमवारी समजेल.
