पेण नगरपरिषद खुला महिला प्रवर्गासाठी राखीव

Uncategorized

पेण :- प्रतिनिधी

सर्वोच न्यायालयाने जानेवारी महिना संपण्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे निवडणुक प्रक्रियेच्या कामाला वेग आला आहे. प्रशासनाने वेगाने तयारी देखील सुरु केली आहे. आज मंत्रालयात मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष पदाची सोडत काढण्यात आली. त्यामध्ये रायगड जिल्हातील पेण, अलिबाग, उरण नगरपालिका खुला महिला प्रवर्ग तर, कर्जत, मुरुड-जंजिरा नगरपालिका ओबीसी महिला राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पोलादपूर, खालापूर, तळा या नगरपंचायतीमध्ये ओबीसी खुला राखीव म्हणून जाहीर केला आहे.

एकंदरीत रायगड जिल्हयात महिलांच्या वाट्याला जास्तीची संधी उपलब्ध झाली आहे. पेणमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने अनेकांचे स्वप्न भंग झाल्याचे बोलले जात आहे.