पेणमध्ये पुरग्रस्तांना मदत

Uncategorized

पेण : प्रतिनिधी

श्री गणपती देवस्थान व श्रीकृष्ण जन्माष्टमी व श्रीगणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात आसमानी संकटाने बळीराजाचे नुकसान व बळीराजाला आवश्यक असलेली मदत करणे ही आपली जबाबदारी समजून पेण येथील या दोन मंडळाने अकरा-अकरा हजार अशी वावीस हजाराची मदत महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीला केली आहे. याविषयी गर्जा रायगडशी बोलताना श्री गणपती देवस्थानचे अध्यक्ष प्रसाद आघारकर यांनी सांगितले की, मराठ वाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात ढगफुटी सादृश्य पावसामुळे सर्वांत जास्त नुकसान वळीराजाचे झाले आहे. या वळीराजाचे सर्वच नुकसान आमच्यासारखी छोटी मोठी मंडळ पूर्ण करु शकत नाही. परंतू, रामसेतू बांधताना जो खारीने वाटा उचलला तोच खारीचा वाटा आम्ही फुल ना फुलाची पाकळी देउन मदत करत आहोत जर वळीराजा जगला तर आपण सर्वजण जगू या भावनेखातीरच आमचे सहकारी, समीर साने, प्रसन्न मोडक, दिलीप बापट, प्रशांत ओक, आनंद विवलकर, शेखर साठे आदी एकत्र येउन हा आम्ही निर्णय घेतला आणि १ ऑक्टोंबरलाच मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये अकरा- अकरा हजाराच्या दोन एनएफटी केल्या आहेत. आमच्या प्रमाणे इतरांनाही बळीराजा मदत करावी हीच अपेक्षा.