पेण :- प्रतिनिधी
५० वी कोकण परिक्षेत्रिय क्रिडा स्पर्धा रत्नागिरी येथे सुरू असून, या स्पर्धेमध्ये कळंबोली नवि मुंबई पोलिस स्टेशनचे जलतरण पडू संकेत केशव म्हात्रे याने भरीव कामगिरी करत दोन सुर्वण व एक कास्य अशी पदकं पटकाविले आहेत.
पोलिस खात्याकडून दरवर्षी क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. ८ ते १३ डिसेंबर या वर्षाच्या क्रिडा स्पर्धा रत्नागिरी येथे घेण्यात येत आहेत. यामध्ये सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या जिल्हयातील पोलिस खात्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये जलतरण स्पर्धेमध्ये पेण तालुक्यातील पाटणेश्वर गावचे सुपूत्र तथा कळंबोली नवि मुंबई पोलीस स्टेशनचे पोलिस हवालदार संकेत म्हात्रे यांनी जलतरणच्या ५० मीटर फ्री स्टाईलमध्ये सुवर्ण पदक, १०० मीटर फ्री स्टाईल सूवर्ण पदक, ४ बाय १०० मीटर आयएम रीले कास्य पदकं पटकाविली आहेत. त्याच्या या यशाबद्दल कळंबोली नवी पोलिस स्टेशनच्या अधिकारी वर्गाकडून तसेच पाटणेश्वर ग्रामस्थांकडून त्याचे अभिनंदन केले जात आहे.
