नगराध्यक्ष प्रितम पाटील यानी सांभाळले कार्यभार
पेण: प्रतिनिधी
गेली साडेतीन वर्ष पेण नगरपालिकेचा कारभार प्रशासकाच्या ताब्यात असल्याने अंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातोय अशी अवस्था झाली होती एकीकडे प्रशासकाला नाक दाबून बुक्क्याचा मार तर दुसरीकडे विकासाच्या नावाने सर्व बाजूने बोंबाबोंब अशी कात्रीमध्ये पेणकर फसलेले असतानाच पेग शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या शिलेदारांच्या समवेत आज नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रितम ललीत पाटील यांनी अकराच्या सुमारास फटाक्याच्या अतिशबाजीमध्ये वाजत गाजत पेण नगरपालिका कार्यालयात तिसऱ्यांदा नगराध्यक्ष म्हणून प्रवेश केला. यावेळी मनोमन प्रितम पाटील यांच्या सोबत निवडणुकीमध्ये काम केलेल्या समर्थकांच्या सोबत काही फुशारकी मारणाऱ्या मंडळींनी देखील अल्लोट गर्दी केली होती अशांच्या उपस्थितीमध्ये आणि आमदार रविशेठ पाटील यांच्या साक्षीने मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी नगराध्यक्ष पदाचे अधिकृत पत्र प्रितम पाटील यांना देऊन त्यांच्या दालनामध्ये त्यांच्या खुर्चीत विराजमान केले त्यावेळी एकच जल्लोष पहायला मिळाला
नगराध्यक्ष पदप्रहण सोहळयाचे औपचारिक कार्यक्रम पेण नगरपालिका कार्यालयाच्या सभागृहामध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पाडण्यात आला यावेळी पदाधिकारी व कार्यकत्यांनी पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन प्रितम पाटील यांचा जंगी स्वागत केला यावेळी नवनिर्वाचित गट नेते अनिरुध्द पाटील यांचे देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्याचबरोबर प्रितम पाटील यांचे सभागृहामध्ये नव्याने निवडुन आलेल्या शिलेदारांचे देखील पुष्पगुच्छ देऊन स्थागत करण्यात आले यावेळी प्रितम पाटील यांनी आपल्या पहिल्याच भाषणात येणाऱ्या काळामध्ये विकासाची दिशा काय असेल यावर भाष्य करत पेणकरांना पन्नास वर्ष पुरेल येवढ्या पाण्याची सोय येत्या या वर्षभरात करण्याची योजना कार्यान्वित करणार असल्याचे सांगून स्वच्छ पेण, सुंदर पेण, सुटसुटीत पेण पाच वर्षात पहायला मिळणार असल्याचे देखील सांगितले यावेळी आमदार रविशेठ पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करुन पेणकरांचे विशेष आभार मानत पेण शहराच्या पाणी योजनेसाठी निधी कमी पडू देणार नाही तसेच या योजनेच्या उद्द्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांना आपण आणणार असल्याचे शेवटी सांगितले.

