पेणःप्रतिनिधी
महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, अमृत या महाराष्ट्र शासनाची स्वायत्तता संस्था आयोजित खुल्या प्रवर्गातील ब्राम्हण, गुजराती, मारवाडी, सिंधी, कच्ची, पाटीदार, राजपूत आदि प्रवर्गासाठी दि. 14 सप्टेंबर 2025 रोजी अमृत मेळाव्याचे आयोजन पेण भाउसाहेब नेने महाविद्यालय सभागृह येथे आयोजित करण्यात आले आहे.
सदर मेळाव्यात प्रमुख पाहुणे व वक्ते ऍड. बापुसाहेब नेने, बँक ऑङ्ग इंडिया पेण ब्रांच मॅनेजर सौरभ पणशीकर उपस्थित राहणार आहेत. सदर मेळाव्यात उद्योग, व्यवसाय, शैक्षणिक कर्ज लाभ या योजनांची संपूर्ण माहिती व मार्गदर्शन संबंधित अधिकारी वर्गांकडून होणार आहे. याकरीता ऍड. मंगेश नेने, अमृत रायगड जिल्हा व्यवस्थापक शैलेश मराठे, अमित सामंत कोकण विभाग व्यवस्थापक, तसेच महेश हेलवाडे पेण ब्राम्हण सभा, यांच्याशी संपर्क साधून मेळाव्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना ऍड. मंगेश नेने सांगितले.
