हे सात शो पिस आहेत गोडाउन भला मोठा आहे :- खासदार धैर्यशील पाटील

Uncategorized

पेण : प्रतिनिधी

चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन सोहळ्या प्रसंगी राज्य सभेचे खासदार धैर्यशील पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आत्ता जो सत्कार झाला आहे ते सात जण म्हणजे सी. एफ. आय. चे शो पिस आहेत. गोडाउन भला मोठा आहे त्यामध्ये असे अनेक जण आहेत. अशा अनेक जणांच्या जीवनाला योग्य मार्ग दाखविण्याचे काम सी. एफ. आय. ने केले आहे. एकप्रकारे जगन्नाथांचे रथ खेचण्याचे काम डॉ. किशोर देशमुख यांच्या माध्यमातून सी. एफ. आय. ने केलेले आहे आणि भविष्यात ही करत राहिल. असे वक्तव्य करत सी. एफ. आय. च्या कामाचे विशेष कौतुक केले.

प्रथम इमारतीचे उ‌द्घाटन आमदार खीशेट पाटील, खासदार धैर्यशील पाटील, प्रमोद हिंदूराव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सी.एफ. आय च्या नवीन सभागृहामध्ये गणपती बाप्पा आणि माता सरस्वती देवीचे दिप प्रज्वलन करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत संदेश म्हात्रे यांच्या हस्ते पुष्प गुच्छ देउन  करण्यात आले. त्यानंतर डॉ किशोर देशमुख यांनी प्रास्ताविक सादर करत आपले काही अनुभव सांगितले. त्यानंतर सी. एफ. आय प्रतिपालीत मुलांचे सत्कार करण्यात आले त्यामध्ये डॉ. ओम पाटील, सुशात खाकर, तेजेस घरत, उत्तम डोके, सुप्रिया मुंडे, कु. सिध्दी ऐरंडे, कु. संतोषी पाटील, या सात जणांना भेटवस्तू देउन मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आले. यावेळी सत्कार मुर्ती मध्ये उत्तम डोके, सिध्दी ऐरंडे, आणि सुप्रिया मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर प्रमुख अतिथी प्रमोद हिंदुराव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे उद्घाटक आमदार रवीशेट पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी जि.प. सदस्य डी.बी. पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती महादू मानकर, मा. उपनगराध्यक्ष दिलीप लाड, मा. उपनगराध्यक्ष दिपक गुख, श्रीमती अरुणा देवी मोरे, परशुराम लाड, सदा पवार, मंगेश दळवी, गजानन मोरे, अंजली जोशी मुख्याध्यापिका, प्रवीण म्हात्रे, प्रकाश शिंगरूत अदी मान्यवर उपस्थित होते.