पेणच्या वडखळ विभागात गुटखा व मटका जोरात

Uncategorized

पेण :-  प्रतिनिधी

गेली तीन ते चार महिने रायगड जिल्हयामध्ये गुटखा आणि मटक्यावर पोलिसांची करडी नजर असताना देखील, पेण तालुक्याच्या वडखळ तसेच रोहा तालुक्याच्या नागोठणे आणि अलिबाग तालुक्याच्या पोयनाड विभागात सर्रास हे दोन्ही अवैध्य धंदे पोलीसांची नजर चुकवून केले जात आहेत. महत्वाची बाब म्हणजे हे धंदे बसस्थानकाच्या शेजारी, रिक्षा स्टँडच्या शेजारी तसेच जेथे वाहतूक व्यवस्थेची सुविधा आहेत अशा ठिकाणी हे दोन्ही अवैध्य धंदे सुरु आहेत. गुटखा माफिया बिनधास्तपणे हा धंदा करत असून, याच्यावर लगाम घालण्यात पोलीसांना अपयश येत आहे की, अपयश आल्याचा कांगावा करीत आहेत हे न समजण्यासारखी गोष्ट आहे. तसेच मटक्याचे नंबर घेण्यासाठी चुप्या पध्दतीने मटक्या माफियांची माणसं देखील कार्यरत असल्याचे नजरेस पडत आहे. मात्र हे खाकीवाल्यांना दिसत नाही ही देखील बाब आश्चर्याची आहे. एकंदरीत तेरी भी चुप मेरी भी चुप सब करेंगे गुपचूप गुपचूप या मटका माफियांना आणि गुटखा माफियांना रायगड पोलिस वेसन घालतील का? अशी चर्चा आत्ता जोरधरु लागली आहे.