सुवर्ण महोत्सवी सांगता कार्यक्रम संपन्न

Raigad

पेण एज्युकेशन सोसायटीचे प्रायव्हेट हायस्कुल व ज्युनइर कॉलेज पेण यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ मोठया उत्साहात पार पडला. प्रायव्हेट हायस्कूल ज्युनइर कॉलेज 1975 ला सुरुवात झाली तेव्हापासून 2015 पर्यंतच्या मा. विद्यार्थ्यांना सांगता समारंभाचे आमंत्रण दिले होते या सांगता समारंभासाठी जिल्हया बाहेरून राज्या बाहेरुन तसेच देशा बाहेरून देखील माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांना ढोल ताशाच्या गजरात व्यासपीठावर आणण्यात आले. त्यानंतर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या ङ्गलकाचे अनावरण करण्यात आले तद् नंतर सरस्वती पुजन, दीपप्रज्वलन यानंतर कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी स्वागत गीत व इशस्तवन गायले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत शाल, श्रीङ्गळ व भेटवस्तू देउन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी माजी विद्यार्थी खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवीशेठ पाटील, उद्योजक राजू शेठ पिचिका, पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ऍड. मंगेश नेने, उपाध्यक्ष संजय कडू, कार्याध्यक्ष प्रशांत ओक, सचिव बाळासाहेब जोशी, सदस्य समीर सोने, सदस्य डॉ निता कदम, अमित देव, श्रीराम दातार, शंकर भट, दिंगबर चिंचणीकर, माजी कार्याध्यक्ष बापूसाहेब आठवले, प्राचार्य आर.एम.पाटील, उप प्राचार्य पी.एम. भांडवलकर, उप मुख्याध्यापिका एस एस घरत, नगरसेवक निलकंठ म्हात्रे अदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी स्मरणीकेचे प्रकाशन प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर माजी विद्यार्थी अश्र्विनी गाडगीळ व निलकंठ म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रमुख अतिथी खासदार धैर्यशील पाटील यांनी आपल्या मनोगतात अनेक आठवणी सांगत समस्त माजी विद्यार्थ्यांमध्ये हस्या पिकवला. तसेच आमदार रवीशेठ पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष ऍड. मंगेश नेने यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे आभार मानद सचिव सुधीर जोशी यांनी मानले. तर कार्याक्रमाचे सुत्र संचालन अथर्व घाटे व कोमल मोहरे यांनी केले. तद् नंतर माजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्याक्रम झाले. त्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. आणि गोड आठवणी घेउन सर्व माजी विद्यार्थी निघून गेले.