पेणःप्रतिनिधी
तीनाचाकी रिक्षा चालक मालक संस्था चावडीनाका यांच्याकडून सालाबाप्रमाणे यावर्षी देखील 7 जानेवारी रोजी श्री सत्यनारायणाच्या महापुजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दुपारच्या सत्रात रिक्षा चालक मालक संघटनेच्या कुटुंबियांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. तर संध्याकाळच्या सत्रात ज्योत्स्नाई म्युझिकल ग्रुप सायली मानकवळे यांच्या सुगमसंगिताच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी नवनिर्वाचित पेण नगरपालिका भाजपचे गटनेते अनिरूध्द पाटील, मा.उपनगराध्यक्ष दिलीप लाड, नगरसेविका संगीता लाड, मा.उपनगराध्यक्ष दिपक गुरव, मा.नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष श्रृगांरपुरे, नगरसेवक संजय म्हात्रे, नगरसेवक भुषण कडू,नगरसेविका सुजाता डाकी, मा.नगरसेवक रविंद्र जाधव, भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष स्वप्निल म्हात्रे, अंतोरा सरपंच अमित पाटील, चंद्रकांत पाटील, पत्रकार अनिस मनियार तसेच डी.वाय.एस.पी जालींदर नालकुन, पोलीस निरिक्षक संदिप बागुल, अदींनी सदिच्छा भेट देउन तिर्थप्रसादाचा लाभ व सुगम संगिताच्या कार्यक्राचा अस्वाद घेतला. यावेळी पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संदिप बागुल यांनी तिनचाकी रिक्षा चालक मालक संस्था चावडीनाक्याच्या सर्व सदस्यांचे विशेष कौतुक करून जी आपण शिस्त पाळत आहात ती अशिच पुढे ही पाळत रहा आणि पोलीस खात्याला मदत करा. पेणच्या चावडीनाक्यावरील रिक्षावाले हे खर्या अर्थाने या विभागातील पोलीसांचा तिसरा डोळा आहे असे कौतुकास्पद उद्गार शेवटी पोलीस निरक्षक संदिप बागुल यांनी काढले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष अमोल घोटणे, उपाध्यक्ष बंटी नाईक, सचिव बाळा नाईक, खजिनदार प्रङ्गुल्ल जोशी, कार्याध्यक्ष मंदार मोडक, यांच्यासह सर्व संघटनेच्या सभासदांनी विशेष मेहनत घेतली.
