पेण : प्रतिनिधी
“पर्यावरण वाचवा, गणपती उत्सव साजरा करा” या टॅगलाईनखाली गर्जा रायगड – साद संवाद यांच्या वतीने आयोजित इकोफ्रेंडली गौरी-गणपती रिल्स स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.
स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांमधून प्रथम क्रमांक विनित तांडेल (निगडे-आमटेम), द्वितीय ऋषिकेश गावंड (दुरशेत) आणि तृतीय नितीन पाटील (वडखळ ) यांनी मिळवला.
विजेत्यांना गर्जा रायगडच्या वर्धापन दिनानिमित्त ९ फेब्रुवारी २०२७ रोजी पेण येथे बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे
