पेण : प्रतिनिधी
पेण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे पेण शहरातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पक्षाने दिलेल्या आदेशानुसार नुकत्याच आमदार रवीशेठ पाटील यांच्या निवासस्थानी घेण्यात आल्या. सदर मुलाखती दरम्यान भाजप दक्षिण जिल्हा अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील पेणच्या मा. नगराध्यक्षा प्रितम पाटील ज्येष्ठ भाजप नेते बाळासाहेब जोशी जिल्हा पदाधिकारी श्रीकांत पाटील पेण शहर अध्यक्ष रवींद्र म्हात्रे, भाजप पदाधिकारी समीर साने अदी उपस्थिती होते.
पक्षाच्या वतीने सर्व इच्छुक उमेदवारांची सविस्तर कार्याची व जनाधाराची पडताळणी करण्यात आली. पुढील काळात सर्व उमेदवारांचा सखोल विचार करुन योग्य, प्रामाणिक जनसेवेसाठी तत्पर उमेदवारांस भाजपकडून उमेदवारी देण्यात येईल. असे वरिष्ठांनी स्पष्ट केले. सदर मुलाखतींना इच्छुक उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पक्षाच्या अंतर्गत लोकशाही प्रक्रियेतून योग्य उमेदवार निवडला जाणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
