दोन दिवसात एकही उमेदवारी अर्ज नाही.

Political

पेण ः प्रतिनिधी
10 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. मात्र दोन दिवसात पेण नगरपालिकेत एक ही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही याचे महत्वाचे करण म्हणजे युत्या आघाडया यांची बोलणी पूर्ण होत नाही. काल पर्यंत भाजप राष्ट्रवादी एकत्र येतील अस वाटत असतानाच त्यांची बोलणी फिसकटल्याचे समजते तर राष्ट्रवादी आम्ही पेणकर विकास आघाडी आणि माजी नगराध्यक्ष संतोष श्रृंगारपूरे हे एकत्र येत असल्याची वार्ता समाज माध्यमांवर जोरधरु लागली आहे. त्यामुळे राजकीय पक्ष सावध भुमिका घेउन उमेदवारी अर्ज भरण्यास उशिर करत आहेत. मनसे, उबाठा आणि शेकाप स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहेत. परंतू त्यांच्यापैकी कोणीही दोन दिवसात आपला उमेदवारी अर्ज भरलेला नाही. एकंदरीत उमेदवारी अर्ज न भरण्याचे हेच कारण आहे की, प्रत्येक जण सावध पवित्रा घेत आहेत.