वढाव बहिरी देवाची यात्रा श्रध्दा, परंपरा उत्साह यांचा संगम

Raigad

पेण : प्रतिनिधी

चैत्र मास सुरू होताच ग्रामदेवतांच्या यात्रेना पेण तालुक्यात सुरूवात होते. ग्रामदेवतांच्या यात्रा म्हणजे माणवी समूह जीवनातील निखळ, स्वच्छंदी जीवनातील पूर्वपार चालत आलेल्या परंपरा आहेत. यातीलच एक ग्रामयात्रा म्हणजे वढावच्या बहिरीदेवाची यात्रा या यात्रेचे एक अगळे वेगळे वैशिष्टय आहे ते म्हणजे बहिरी देवाला डोक्यावर घेउन छबिना नाचवला जातो हा छबिना संपूर्ण पंचक्रोशीत ढोल या वाद्याच्या गजरात फिरवला जातो यामध्ये खास आकर्षन असते तो म्हणजे या छबिन्याबरोबर लेपा फिरतो यामध्ये तरुणांकडून पारंपरिक पदध्तीने अंगावर काटेरी पेरकुट (निवडुंग) पाठिवर मारण्याची प्रथा असून श्रध्देच्या भरात अनेक तरुण बेभान होऊन स्वतःच्या अंगावर पेरकूट मारताना दिसतात. यावेळी काहीजण रक्तबंबाळ होत असल्याचे चित्र पहायला मिळाले. तसेच काहीजण पेरकूटांच्या राशिवर उड्या मारतात. ही प्रथा अनेक वर्षापासून सुरु असून भाविक श्रध्देने ही प्रथा पाळत असतात. तसेच सायंकाळच्या सत्रात देवकाठ्यांचीही चढाओढ पहायला मिळते. या यात्रेच्या निमित्ताने पेरकुटांची अगळीवेगळी प्रथा बघण्यासाठी तालुक्यासह जिल्हयातून अनेक भाविक वढावच्या यात्रेमध्ये हजेरी लावतात.