अपंग मुलासाठी मदतीचा हात, वाशी उपसरपंचांकडून तीन चाकी सायकल मेट

Uncategorized

पेण : प्रतिनिधी

पेण तालुक्यातील वाशी ग्रामपंचायतीत १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधत एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. वाशीच्या उपसरपंच कोमल भाई म्हात्रे यांनी त्यांच्या स्वखर्चातून अपंग व गरजू मुलगा कुमार भावेश गोपीनाथ पाटील याला तीन चाकी सायकल भेट दिली.

मावेशच्या दैनंदिन हालचालींसाठी अत्यंत आवश्यक असलेली ही सायकल मिळाल्याने त्याच्या जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण समोर आले आहे. या कार्यक्रमावेळी सरपंच संदेश ठाकुर, सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक विश्वनाथ पाटील, ग्रामसेवक राजेंद्र गुडदे, आशा वर्कर तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी स्वखर्चाने मदत केल्याबद्दल उपसरपंच कोमल म्हात्रे यांचे पती भाई म्हात्रे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या उपक्रमामुळे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून, अशा सामाजिक कार्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.