पेण : प्रतिनिधी
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. नाना पाटेकर यांचा जन्म मुरूडचा असला तरी त्यांच्या कुटुंबाची पेणशी जुनी आणि जिव्हाळ्याची नाळ होती.
नाना पाटेकर यांचे पणजोबा कृष्णाजी पाटेकर हे पेणचे रहिवासी होते. प्रभू आळीतील वनगे हॉस्पिटलच्या उत्तरेला असलेल्या गुप्ते वाड्यात त्यांचे वास्तव्य होते. कृष्णाजी पाटेकर हे कृष्णभक्त असल्याने त्यांनी पेणमध्ये कान्होबाजे मठ हे प्रसिद्ध मंदिर उभारले.
पूर्वजांनी उभारलेल्या या मंदिराशी नाना पाटेकर यांचेही भावनिक नाते होते. मंदिरात त्यांचे येणे-जाणे होते. त्यामुळे जन्म मुरूडचा असला तरी पेणला ते आपलेच मानत असत.
“मला जाळताना सुक्या लाकडाने जाळा, ओल्या लाकडाने जाळू नका,” असे परखड भाष्य करणाऱ्या नानांच्या आठवणी आता कायमस्वरूपी स्मरणात राहतील. पेणशी असलेला त्यांचा हा ऋणानुबंधही पेणकरांच्या स्मरणात सदैव राहील.
