चारुदत्त चिखले लिखित शिवचरित्राचे मान्यवरांच्या उपस्थिती दिमाखदार प्रकाशन

शिवायन पूर्वार्ध व उत्तरार्ध या दोन भागांतील पुस्तकांचे प्रकाशन पेण ः- प्रतिनिधी वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमा अंतर्गत चारुदत्त चंद्रकांत चिखले लिखित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कथा काव्यगीत स्वरुपातील शिवचरित्राचे शिवायन पूर्वार्ध व शिवायन उत्तरार्ध या दोन भागांतील पुस्तकांचा प्रकाशन सोहळा महात्मा गांधी वाचनालय येथील सभागृहात अतिशय दिमाखदार पद्धतीने पार पडला. याप्रसंगी कस्टम्स व इनडायरेक्ट […]

Continue Reading

हावरे ग्रुपचा म्हाडाच्या जागेत राजरोजपणे बांधकाम

पेण ः प्रतिनिधी मे. हावरे ग्रँड म्हटल्यानंतर एक गृहनिर्माण व्यवसायातील नाव मात्र नाम बडे और दर्शन छोटे पेण नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मे. हावरे ग्रँड यांच्या तर्फे अनिल कुमार सिंघ व उज्वला सतिश हावरे यांच्या नावे सर्वे नं. 256अ/1, 256अ/2 हे सातबारे आहेत. त्याच्याच शेजारी असलेल्या 256अ/3 हा महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ क्षेत्र विकास या नावाने […]

Continue Reading

वडखळ अंगणवाडीत खाऊत सापडला उंदीर

पेण ः- प्रतिनिधी पेण तालुक्यातील वडखळ अंगणवाडीमध्ये महाराष्ट्र शासनाकडून 6 महिने ते 3 वर्षाच्या बालकांसाठी येणार्‍या खाउचे वाटप सुरु असताना एक पिशवीमध्ये अंगणवाडी सेविकांना संशयास्पद कडक वस्तू असल्याचे अढळून आले. त्यावेळी त्यांनी ते पाकीट फोडले असता त्यामध्ये कुजलेल्या अवस्थेत उंदीर अढळून आला. त्याच वेळी तातडीने अंगणवाडी सेविकेने समोरच ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सरपंच व सदस्य उपस्थित होते. […]

Continue Reading

पेण तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पेणः वार्ताहार पेण प्रांत कार्यालयाचे ध्वजारोहण प्रांताधिकारी प्रविण पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी स्थानिक आमदार रविशेठ पाटील, तहसिलदार तानाजी शेजाळ उपस्थित होते. तर पेण नगरपालिकेचे ध्वजारोहण मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या हस्ते झाले. नगरपालिकेच्या ध्वजारोहणासाठी माजी नगराध्यक्षा, नगरसेवक मोठया संख्येने उपस्थित होते. तर प्रांत कार्यालयातील ध्वजारोहणासाठी पेण तालुक्यातील राजकीय पक्ष्यांचे पुढारी कार्यकर्ते तसेच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील […]

Continue Reading

भाल विठ्ठलवाडीतील विठ्ठल मंदिराचे पुजारी बंडया भटजींचे निधन

पेण ः प्रतिनिधी पेण भाल विठ्ठलवाडी येथील विठ्ठल रखुमाई संपूर्ण वाशी पंत्रक्रोशीतील प्रसिध्द व मितभाषी असलेले पुरोहित यांचे नुकतेच दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते 80 वर्षांचे होते. त्यांना मुलगा, मुलगी, सून, व नातू असा त्यांचा परिवार आहे. विठ्ठलाचे पुजारी दिवाकर भिडे यांचा मूळ रहिवास रत्नागिरी येथील. आपले नशीब अजमावण्यासाठी ते भाल विठ्ठलवाडीत […]

Continue Reading

श्रमदानातून आदिवासी बांधवांनी बांधला बंधारा

पेण ः मुस्कान खान पाबळ खोर्‍यातील दुर्गम भागात बोरीचामाळ हा साधारणः 500 लोकवस्ती असलेला आदिवासी समाजाचा गाव आहे. या गावामध्ये पूर्वी रोजगार हमीतून काकळकोंड ओढयाला बंधारे बांधून पाणी अडविण्याचे काम केले जात असत. मात्र गेली 4 ते 5 वर्ष रोजगार हमीतून शासन निधी उपलब्ध करून देत नसल्याने या गावातील तरुणांनी एकत्र येउन सामुहिक निर्णय घेतला […]

Continue Reading

लाडकी बहिण तुपाशी मात्र विदयार्थी राहणार उपाशी

पेण ः प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर करुन भरभरून लाडक्या बहिणींची मत घेतली. मात्र लाडक्या बहिणींना पैसे देत असताना मध्यान्ह भोजन योजनेचे पैसे गायब झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सप्टेंबर महिन्यापासून मध्यान्ह भोजन आहारासाठी योणारी निधी आलेली नाही. त्यामुळे गेली 5 महिने मध्यान्ह भोजन आहार देणार्‍या बचत गटांची मोठी तारांबळ उडालेली आहे. […]

Continue Reading

पेण नगरपालिकेचा मनमानी कारभार

पेणःप्रतिनिधी गेल्या पाच वर्षात पेण शहर झपाटयाने वाढत आहे. त्यामुळे पेण शहराच्या विकासाचा विचार करता पेण शहराच्या बाजुने वेगवेगळे पाच रिंगरोड मंजूर झाले आहेत. काही प्रमाणात त्या रिंगरोडची कामे देखील झालेली आहेत. रिंगरोडसाठी लागणार्‍या जागेला काही शेतकर्‍यांनी विरोध केला आणि त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ही थोटावले. परंतु काही असे ही शेतकरी आहेत की, ज्यांना पेणचा विकास […]

Continue Reading

खारेपाटात दुर्गंधी युक्त पाणी पुरवठा

पेण :-मुस्कान खान खारेपाट विभागाच्या पाचवीला पाणी प्रश्र्न पुजलेला आहे. गेली आठवडाभर या विभागात दुर्गंधी युक्त पाणी पुरवठा होत असल्याने वाशी ओढांगीसह खारेपाटातील जनता हैराण झाली आहे. खारेपाट विभागासाठी शहापाडा धरणातून पाणी पुरवठा होत असून रायगड जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग हा पाणी पुरवठा करत आहे. मात्र अगदी स्वतंत्र पुर्व काळापासून खारेपाटाला मिळालेला शाप म्हणजे […]

Continue Reading

पेण तालुक्यात पत्रकार दिन उत्साहात साजरा

। पेण । प्रतिनिधी 6 जानेवारी मराठी पत्रकार दिन पेण तालुक्यात मोठया उत्साहत साजरा करण्यात आला. सायंकाळी पेण गांधी वाचनालय येथे रोटरी क्लबच्या माध्यमातून पेण तालुक्यातील सर्व पत्रकारांना भेट वस्तू व प्रमाणपत्र देउन सत्कार करण्यात आले. तर सायंकाळी पेण येथील सर्व पत्रकारांसाठी स्नेहसंमेलन कार्यक्रम राजन लाड फार्म हाउस धावटे येथे संपन्न झाला. तालुक्यातील सर्व पत्रकार […]

Continue Reading