निलेश म्हात्रे मित्र मंडळाचे रक्तदान शिबीर संपन्न

Raigad

पेण ः प्रतिनिधी
वडखळ ग्रामपंचायतीचे सदस्य तथा समाजिक कार्यकर्ते निलेश पांडुरंग म्हात्रे यांच्या 50 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून निलेश म्हात्रे मित्रमंडळ व गणपती देवस्थान वडखळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि शासकीय रक्त केंद्र अलिबाग यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीराचे आयोजन वडखळ येथे करण्यात आले होते. या शिबीरामध्ये शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबीरासाठी वडखळ सरपंच शिवानी म्हात्रे, वडखळ चे माजी सरपंच योगेश पाटील, माजी उपसरपंच प्रभाकर म्हात्रे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या वेळी आयोजक निलेश म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच त्यांचे चिरंजीव हेमांक्ष याने आपले पहिले रक्तदान केले.
रक्त संकलन करण्याचे काम शासकीय रक्तकेंद्र अलिबागचे डॉ. दिपक गोसावी रक्त संक्रमण अधिकारी, नवनाथ अळ्‌ळी समाजसेवा अधिक्षक, विशाल भगत, वैभव कांबळे, सुनील बंधिछोडे, सुशांत भगत, मंगेश पिंगळा, महेश घाडगे आदिनी काम केले. या रक्तदान शिबीराला नगरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.