रायगडमध्ये 4,156 तर पेणमध्ये 784 दुबार मतदार

Political

पेण ः प्रतिनिधी
राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतीचे निवडणुकीचे बिगुल वाजले असून, रायगड जिल्हयातील 10 नगरपरिषदेंचा यामध्ये समावेश आहे. 10 नगराध्यक्षांसह 217 नगरसेवक निवडून येणार आहेत. पूर्ण जिल्हयात 2,37,503 मतदार असून यामध्ये 4,156 मतदार हे दुबार आहेत. पेण नगरपालिकेचा विचार करता 12 प्रभागांमध्ये 24 नगरसेवक निवडुन येणार असून एकूण मतदार 33,875 आहेत. यामध्ये 784 मतदार हे दुबार आहेत. या दुबार मतदारांवर निवडणुक यंत्रणेची करडी नजर असणार आहे. या मतदारांच्या नावासमोर डब्बल स्टार लावला आहे. या मतदारांनी हामीपत्र देउन आपले मतदान करायचे आहे. मात्र हामीपत्र देउनही दोन्ही ठिकाणी मतदान करण्याचा प्रयत्न केल्यास या मतदारांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे दुबार मतदारांचा प्रश्र्न निकाली काढताना निवडणुक यंत्रणेचा कस लागणार आहे.