चार वर्षे परिश्रम करा, पुढील ४० वर्षे सुवर्णकाळ अनुभवाः प्रमोद म्हात्रे

पेण : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सीएफआय युनिट पेणतर्फे धनादेश व स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे वाटप नुकतेच सीएफआय कार्यालयात करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी शिवछत्रपती पुरस्कार विजेते कबड्डीपटू प्रमोद म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “बारावीनंतर चार वर्षे परिश्रम करा, पुढील ४० वर्षांचा काळ तुमचा सुवर्णकाळ असेल,” असे सांगितले. कोणतीही नोकरी […]

Continue Reading

पेणच्या कला केंद्रात देवी साकारण्याची लगबग !

बाप्पांच्या निर्मितीनंतर आता कलाकारांची धावपळ देवीमूर्तीसाठी; हुबेहूब जिवंत भासणाऱ्या मूर्तीना अंतिम साज पेण प्रतिनिधी गणेशमूर्ती निर्मितीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेणमध्ये आता नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. गणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर पेणच्या कला केंद्रातील मूर्तिकार आणि कलाकार आता देवीमूर्ती साकारण्यात मग्न झाले आहेत. येत्या रविवारी घटस्थापना होणार असल्याने शहरातील मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये सध्या एकच लगबग सुरू असून, देवीच्या […]

Continue Reading

अनधिकृत टपरीधारकांची अरेरावी!

रस्ते रुंदीकरण टपऱ्यांसाठीच का? पेण : प्रतिनिधी पेण शहरात अनधिकृत टपऱ्यांचा सुळसुळाट वाढला असून, रस्ते रुंदीकरण करूनही त्याच रस्त्यांवर पुन्हा टपऱ्या थाटल्या जात असल्याने नगरपालिका प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या टपरीधारकांकडून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाच दमदाटी व धमक्या दिल्या जात असल्याने पेणमध्ये ‘टपरी माफियांचा’ हैदोस सुरू आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. […]

Continue Reading

ऑक्टोबर हिटने नागरिक हैराण; उकाड्याने वाढवला त्रास

पेण : प्रतिनिधी पावसाळा संपताच पेण तालुक्यात पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून ऑक्टोबर हिटमुळे नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत असल्याने दुपारच्या वेळेत रस्त्यांवर वर्दळ कमी होताना दिसत आहे. ऑक्टोबर महिन्यातील वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत असून उकाड्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांकडून थंड पेये, उसाचा रस, नारळपाणी तसेच लिंबू सरबताचा आधार घेतला […]

Continue Reading

नाना पाटेकर यांचा पेणशी ऋणानुबंध; कान्होबाजे मठाशी होते भावनिक नाते

पेण : प्रतिनिधी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. नाना पाटेकर यांचा जन्म मुरूडचा असला तरी त्यांच्या कुटुंबाची पेणशी जुनी आणि जिव्हाळ्याची नाळ होती. नाना पाटेकर यांचे पणजोबा कृष्णाजी पाटेकर हे पेणचे रहिवासी होते. प्रभू आळीतील वनगे हॉस्पिटलच्या उत्तरेला असलेल्या गुप्ते वाड्यात त्यांचे वास्तव्य होते. कृष्णाजी पाटेकर हे कृष्णभक्त […]

Continue Reading

मध्यान्ह भोजनाचा पुरवठा ठप्प; बचत गटांची आर्थिक कोंडी

जूनपासून धान्य, तेल आणि देयकांचा पत्ता नाही; बचत गटांसमोर योजना बंद करण्याची वेळ पेण : प्रतिनिधी शासनाच्या मध्यान्ह भोजन आहार योजनेचा कारभार सध्या नियोजनाअभावी अडचणीत सापडला असून, शाळांना भोजन पुरविणाऱ्या महिला बचत गटांची आर्थिक कोंडी झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, जुलैपासून धान्याचा नियमित पुरवठा झालेला नसून तांदळाचा पुरवठा सप्टेंबरपर्यंतच झाला. तसेच तेलाचा पुरवठाही जून महिन्यापासून झालेला […]

Continue Reading

इकोफ्रेंडली गौरी-गणपती रिल्स स्पर्धेचा निकाल जाहीर

पेण : प्रतिनिधी “पर्यावरण वाचवा, गणपती उत्सव साजरा करा” या टॅगलाईनखाली गर्जा रायगड – साद संवाद यांच्या वतीने आयोजित इकोफ्रेंडली गौरी-गणपती रिल्स स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांमधून प्रथम क्रमांक विनित तांडेल (निगडे-आमटेम), द्वितीय ऋषिकेश गावंड (दुरशेत) आणि तृतीय नितीन पाटील (वडखळ ) यांनी मिळवला. विजेत्यांना गर्जा रायगडच्या वर्धापन दिनानिमित्त ९ फेब्रुवारी […]

Continue Reading

पेण पालिकेच्या महिला कौशल्य विकास शिबिराला प्रारंभ

माझ्या शहरातील महिलांना सक्षम करणे हे माझे कर्तव्य – नगराध्यक्षा प्रितम पाटील  पेण   (वैशाली मलबारी) पेण पालिकेच्या महिला कौशल्य विकास शिबिराला आजपासून नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करून प्रारंभ झाला आहे. यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी बोलताना माझ्या शहरातील माझ्या महिला वर्गाला सक्षम करणे हे आमचे कर्तव्य आहे आणि ते […]

Continue Reading

भाजी मंडई केव्हा सुरू होणार? भाजी विक्रेत्यांचा सवाल

पाच वर्षांपासून गाळे ताब्याच्या प्रतीक्षेत; अमानत रक्कम भरूनही विक्रेत्यांची फरफट पेण : प्रतिनिधी पेण नगरपालिकेने आरक्षण क्रमांक १४ मधील अंतिम भूखंड क्रमांक १०० व १०१ या जागेवर बीओटी तत्त्वावर भाजी मार्केटची उभारणी केली. मात्र, भाजी विक्रेत्यांसाठी उभारण्यात आलेल्या या मार्केटमधील गाळे जवळपास पाच वर्षे उलटूनही संबंधित विक्रेत्यांच्या ताब्यात देण्यात आले नसल्याने “भाजी मंडई सुरू कधी […]

Continue Reading

दोन महिने उलटले, आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती नाहीत!

मयूर वनगे मारहाण प्रकरणात आमदार शशिकांत शिंदे आक्रमक; पोलीस निरीक्षकांना थेट जाब पेण : प्रतिनिधी पेणमधील मयूर वनगे मारहाण प्रकरणाला १ ऑक्टोबर रोजी तब्बल दोन महिने पूर्ण झाले, मात्र या प्रकरणातील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे तपासाच्या गतीवर आणि आरोपींच्या अटकेबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणातील आरोपी म्हणून भाजपचे उपाध्यक्ष […]

Continue Reading