क्रिएटिव्ह ग्रुप चैत्रगौरी हळदी कुंकू मोठया उत्साहात साजरा

वेगवेगळया प्रकारच्या रांगोळींची आरास पेण ः प्रतिनिधी पेण देवआळीतील येथील क्रिएटिव्ह महिला ग्रुप मार्फत गेली 25 वर्ष चैत्रगौरी हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो. पेण शहरातील ब्राम्हवृंदा एकत्र करून हा हळदी कुंकुचा कार्यक्रम केला जातो. यावर्षी गोपाळकृष्ण हॉलमध्ये लग्नाची थिम ठेवून सजावट केली होती. साखरपुडा ते नववधु गृहप्रवेश या सर्व विवाहाच्या सोहळयांची रांगोळी रूपात सजावट केलेली पहायला […]

Continue Reading

भाजपच्या तालुका अध्यक्षाला मारहाण,ऍट्रॉसिटी दाखल

पेणःप्रतिनिधी हमरापुर गावातील स्वयंमघोषीत पुढारी विश्र्वास नामदेव पाटील याने भाजपचे अनुसुचित जाती सेलचे तालुका अध्यक्ष मयुर विजय सुर्वे यांच्यावर हल्ला करून मारहाण केली. तसेच जातीवाचक शिवीगाळ करून पोटात लाथा बुक्के मारल्या. याविषयी सविस्तर वृत्त असे की, दिनांक 04/04/2025 रोजी 11ः00 वाजता जेएसडब्ल्यु कंपनीचे अलिबाग गेटजवळील ब्रिजखालील पीआर ऑङ्गिसच्या कॉन्फरंन्स हॉलमध्ये मिटींगकरीता जेएसडब्ल्यू कंपनीचे आत्माराम बेटकेकर […]

Continue Reading

तरणखोप येथे पेंड्याच्या गोदामाला भीषण आग, लाखोंचे नुकसान

पेण ः- प्रतिनिधी तरणखोप येथील संतोष शेठ घरत यांच्या पेंड्याच्या गोदामाला लाईटच्या शॉट सरकीटमुळे आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तरणखोप ग्रामपंचायतीच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गाच्या शेजारी संतोष शेठ घरत यांचे पेंड्याच्या गठळयांचा मोठा गोडाउन आहे त्या गोडाउनमध्ये जवळपास 1500 ते 1600 पेढयांच्या गठळया होत्या. अचानक विजेच्या तारा शॉट सरकीट होउन […]

Continue Reading

हिंदू नववर्षाच्या स्वागतास दत्त अवधूत एंटरटेनमेंट व स्वररंग पेण आयोजित गाण्याची स्पर्धा (कराओके बेस)संपन्न

पेण प्रतिनिधी हिंदू नववर्षाच्या स्वागतास दत्त अवधूत एंटरटेनमेंट व स्वररंग पेण आयोजित गाण्याची स्पर्धा (कराओके बेस) पेण बोरगाव रोड येथील कौशिकी गार्डन येथे संपन्न झाल्या,या स्पर्धेस श्रोतेवर्गाचा पेण मध्ये उत्कृष्ट असा प्रतिसाद लाभला तब्बल 68 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेऊन 7 तास गाणी म्हणत स्पर्धेचा उच्चांक गाठला. दत्त अवधूत एंटरटेनमेंट व स्वररंग पेण, नेहमीच महाराष्ट्रातील […]

Continue Reading

बापूसाहेब नेने फाउंडेशन व सोबती संघटनेचे पुरस्कार जाहीर

पेणः प्रतिनिधी सोबती संघटना व बापूसाहेब नेने फाउंडेशन पेण मार्फत  ज्येष्ठ समाजसेविका शुभांगी नेने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी बापूसाहेब नेने फाउंडेशन तर्फे पाच शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार दिला जातो. तर सोबती संघटनेमार्फत  विविध क्षेत्रात काम करणार्‍या पाच मान्यवरांना देखील सोबती आदर्श व्यक्तीमत्व पुरस्कार देउन सन्मान केले जाते. यावर्षी सोबती मार्फत सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या […]

Continue Reading

रमजान ईद उत्साहात साजरा

पेण ः प्रतिनिधी पवित्र रमजान महिन्यात चंद्रदर्शन होईपर्यंत दररोज उपवास म्हणजे रोजे पाळले जातात. यामध्ये सुर्योदयापूर्वी अन्नग्रहण केले जाते. सूर्यास्तापर्यंत उपवास पाळला जातो. सूर्यास्ताला प्रार्थना झाल्यावर उपवास सोडला जातो. असे दररोज रोजे पाळले जातात. या काळात कुराण ग्रंथाचे वाचन व चिंतन-मनन केले जाते. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम […]

Continue Reading

सुनेचे स्त्री धन सासर्‍याने लावले व्याजी धंदयाला

उदयोजक सुरेशशेठ पाटील यांच्यावर सुनेचे गंभीर आरोप पेण ः प्रतिनिधी पेण येथील हॉटेल गोमांतकचे मालक उदयोजक सुर्यकांत उर्ङ्ग सुरेश जोमा पाटील यांच्याविरुध्द त्यांची सुन प्रज्ञा अमर पाटील हिने हॉटेल साई सहारा येथे नुकतीच पत्रकार परिषद घेउन सासरे सुरेश जोमा पाटील, नवरा अमर पाटील, दीर भरत पाटील, सासू लक्ष्मी पाटील यांच्याविरुध्द गंभीर आरोप करत सासरे सुरेशशेठ […]

Continue Reading

गर्जा रायगडने केला पोलखोल

भाजी मार्केटच्या लॉकच्या डुबलीकेट चाव्या तयार नगरपालिका कर्मचार्‍यांचा पाठिंबा पेण ः प्रतिनिधी महाराष्ट्र भूषण आदरणीय तिर्थरुप नाना साहेब धर्माधिकारी यांच्या नावाने पेण नगरपालिकेमार्फत भाजी मार्केट कम शॉपिंग मॉल बांधण्यात आला आहे. या भाजी मार्केटमध्ये रस्त्याअभावी भाजी विक्रेत्यांचे गाळे बंद स्थितीत आहेत. भाजी मार्केटच्या मागच्या बाजूस पेण नगरपालिकेने काही अवचित प्रकार घडू नये म्हणून गर्जा रायगडच्या […]

Continue Reading

खासदार धैर्यशील पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

पेण ः प्रतिनिधी आंदोलन सम्राट अशी अवघ्या महाराष्ट्राला धैर्यशील पाटील यांची ओळख आहे. गेल्याच ऑगस्ट महिन्यात भाजपकडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवण्यात आले. बॅरिस्टर ए .आर. अंतुले नंतर रायगडकरांना मिळालेला हा राज्यसभेवर पहिलाच मान आहे. धैर्यशील पाटील यांच्या स्नेहसागर बंगल्यावर मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांच्या हजेरीत साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला देशाचे उपराष्ट्रपती […]

Continue Reading

एप्रिल अखेर निवडणुका?

जिल्ह्यातील 351 ग्रामपंचायतींचे बिगुल वाजण्याची शक्यता,मतदान याद्या अद्ययावत करण्यासाठी प्रशासन लागले कामाला पेण ः- प्रतिनिधी जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील 351 ग्रामपंचायतींच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम सुरु झाला आहे. प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. 26 मार्चपर्यंत प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात […]

Continue Reading